Tuesday, September 4, 2007

गणेशोत्सव वर्गणी एक समस्या?

आपले आवडते दैवत गणपती बाप्पा आता महिनाभरावर येणे आहेत. त्यासाठी हा जाणिवपुर्वक लिहलेला लेख.(मागिल दोन वर्षाच्या अभ्यासावरुन)
गणेशोत्सव मंडळांची संख्या आता बरीच झालेली आहे.आता प्रश्न असा येतो की,यातील बरीच मंडळे रजिस्टर नसतात.मुद्दा असा आहे की दरसाल या निमित्ताने काही मंडळे वर्गणी गोळा करतात. दरसाल वर्गणी गोळा करण्याच्या नादात बरेच अनुसुचित प्रकार करतात.पोलिसांनी आपल्या नुसार जाहीर करुन टाकले आहे की कोणी वर्गणी गोऴा करु नये किंवा केल्यास त्यासाठी कुणावर जबरदस्ती करू नये.जर कोणी दिली तर स्वखुशिने घ्यावी.अवास्तव वर्गणीची मागणी करु नये.

काही अनुभव-
1. काही मंडळे आपल्या मागिल वर्षाचे पुस्तक देतात , शिवाय त्यांची वर्गणीची अपेक्षा आपण जी काही देउ तेवढीच असते.
2. काही मंडळे दुकान पाहुन आत येताच पावती फाडुन हातावर ठेवतात,मग त्यातला आकडा कितीही असो.
3. काही मंडळे खुप घोळका करुन जास्त वर्गणीची मागणी करतात.
4.आणखी भर म्हणजे गल्लीबोळातील मुले पावती पुस्तक घेउन य़ेतात.

पडलेले प्रश्न -
1.की जि मंडळे वर्गणी मागतात, त्या पैशाची खरच मंडऴांना गरज असते?
2.खरच मिळालेले सगऴे पैसे सत्कारणीच लागतात का?

उपाय-
आपल्या पोलिस आयुक्तांच्या सहीचे निवेदनपर पत्र पेपर मध्ये छापुन द्यावे.
जेणेकरुन हे निवेदन पत्र आपण आपल्या सोसायटी मधे, दुकानात व मंडळामधे लावु शकतो.त्यामुळे वरील गोष्टींना आळा बसेल.शिवाय यासाठी खर्च देखिल कमी येईल आणि मुख्य हेतु देखिल साध्य होइल.

माझीसेना.

No comments: